अरेंज मॅरेज - अनोळखी पासून जिवलगा पर्यंत ( भाग - 6 )

Marathi blog

तो संध्याकाळी घरी परतला. तो दरवाजा उघडून आतमध्ये आला. त्याने बूट काढून जागेवर ठेवले. बॅगही टेबलवर ठेवली. त्याला जाणवलं की रोज तो येताच हॉलमध्ये येणारी प्रांजली आज हॉलमध्ये आलेली नव्हती. त्याला थोडीशी काळजी वाटू लागली. तो किचनमध्ये आला. ती किचनमध्ये देखील नव्हती. त्याची काळजी वाढली. कुठं बाहेर तर गेलेली नसेल? त्याला प्रश्न पडला. पण तिने फोन किंवा मेसेज करून कल्पना दिली असती. त्याला मागच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला. तो रूममध्ये आला. त्याने बघितलं ती बेडवर पडलेली होती. तो घाबरला.


त्याने विचारलं, "काय झालं? बरं नाही वाटत आहे का? चल हास्पिटल मध्ये जाऊन येऊत."


ती म्हणाली, "अरे नाही. नको. तब्येत वगैरे ठीक आहे. ते थोडा पाय घसरला होता."


तो म्हणाला, "काय! कधी?"


तो तिच्या जवळ आला. तिला जखम तर झाली नाहीये ना. हे बघू लागला. बाहेरून टणक वाटणारा तो किती घाबरला होता!


तो म्हणाला, "जखम वगैरे तर झाली नाही ना?"


ती म्हणाली, "नाही. थोडी पायात मोच आली आहे फक्त."


तो म्हणाला, "काळजी घ्यायची ना."


तिने मान हलवली. त्याच्या स्वभावाची ही बाजू ती पहिल्यांदा बघत होती. नंतर त्याने एक-दोन दिवस तिची अशी काळजी घेतली जणू ती लहान मुलगीच आहे. नंतर तिचा पाय बरा झाला.


एके दिवशी तिला कुणाकडून तरी एका कंपनीतील जॉब ओपनिंग बद्दल कळलं. ती चांगली शिकलेली होती त्यामुळे तिने जॉबसाठी अप्लाय करायचं ठरवलं. तिला माहित होतं की गगन नकार देणार नाही पण तरी तिने त्याचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेवण आटोपल्यावर ती त्याच्याशी बोलली.


ती म्हणाली, "ते मला एका कंपनीतील जॉब ओपनिंग बद्दल कळलं."


तो म्हणाला, "तुझी इच्छा आहे का?"


ती म्हणाली, "हो."


तो म्हणाला, "ठीक आहे मंग. कर अप्लाय. माझी काय हरकत असणार आहे?"


ती म्हणाली, "हो ठीक आहे."


नंतर तिने जॉबसाठी अप्लाय केलं. नंतर इंटरव्यू वगैरे झाले. तिचा इंटरव्यू चांगला गेला होता. तिला खात्री होती की तिला ही जॉब नक्कीच मिळणार. झालेही तसेच. काही दिवसांनी तिला कंपनीचा मेल आला. तिला जॉब मिळाली होती. ती खूप खुश होती. तिने गगनला सांगितल्यावर तोही खूप खुश झाला. घरचे पण खुश झाले.


आता दोघेही नोकरी करू लागले होते. घरकामासाठी त्यांनी एक कामवाली बाई ठेवली होती. ती सर्व कामे करायची. स्वयंपाक पण छान करायची. अगोदर प्रांजलीला त्याचीच चिंता होती की घरकाम व स्वयंपाक यांचं काय होईल? पण आता ती निश्चिंत झाली होती. एके दिवशी जेवण वगैरे आटोपल्यावर दोघे निवांत बसलेले होते.


प्रांजली म्हणाली, "मी नोकरीला लागल्यापासून आपल्याला जास्त वेळ मिळतच नाही ना एकमेकांसोबत घालवायला!"


तो म्हणाला, "हो ना. काम करून दोघेही दमून जातो. दोघांचे सुट्टीचे दिवस पण वेगवेगळे असतात बऱ्याच वेळा."


ती म्हणाली, "हो ना. टायमिंग मध्ये पण फरक आहे दोघांच्या जॉबच्या."


तो म्हणाला, "हो."


ती पुढे म्हणाली, "उद्या दोघांना पण सुट्टी आहे तर जाऊयात का बाहेर कुठे. तेवढंच रिलॅक्स वाटेल व एकमेकांसोबत वेळही घालवता येईल."


तो म्हणाला, "हो. जाऊयात ना. खूप दिवसांपासून बाहेर गेलो नाहीत आपण. उद्या नक्की जाऊ."


ती म्हणाली, "हो. ठीक आहे."


दुसऱ्या दिवशी दुपारी ते घराबाहेर पडले. मॉल खूप मोठा होता त्यामुळे बघण्यातच त्यांचा बराच वेळ गेला. त्यानंतर प्रांजलीची मोठी शॉपिंग लिस्ट पूर्ण करण्यात वेळ गेला. नेलपॉलिश, आयलानर आणि बरंच काही. तो थोडासा कंटाळला होता. तिला ते जाणवलं.


ती म्हणाली, "हे लास्ट शॉप. प्लिज."


तो म्हणाला, "बरं ठीक आहे."


नंतर तिने त्याला वॉच पसंत करायला सांगितली.


तो म्हणाला, "अगं हे कशाला?"


ती म्हणाली, "तू मला इतके गिफ्ट्स दिलेत. हे माझ्याकडून."


तो हसून म्हणाला, "बरं ठीक आहे."


नंतर त्यांनी चित्रपट बघितला. जेवण पण केलं. नंतर ते घरी परतले. घरी येतांना दोघे खुश होते. घरी आल्यावर तिला जाणवलं की तो काहीतरी विचार करतोय.


ती म्हणाली, "काय झालं? काय विचार करतोय?"


तो म्हणाला, "माझं प्रमोशन झालं आहे."


ती म्हणाली, "अरे ही तर खूप चांगली गोष्ट आहे."


तो म्हणाला, "हो पण ते मला दुसऱ्या शहरात पाठवणार आहेत तर आपल्याला जावं लागेल."


ती पुढे जास्त बोलली नाही. ती झोपी गेली. त्याला वाटलं ती थकली असेल त्यामुळे झोप येत असेल. त्यानं ठरवलं की उद्या बोलूत. ती पडल्यापडल्या विचार करू लागली. तो आपल्याला जावं लागेल असं म्हणाला. तो मला विचारुही शकला असता. मी नोकरी करतांना त्याला त्याचं मत विचारलं होतं. त्याने का नाही विचारलं? नेहमी मीच तडजोड करायची का? माझी जॉब काहीच नाही? तसंतर तो जिथे जाईल तिथे मला जॉब मिळेल पण निदान त्याने विचारायला तर हवं ना! या नात्यात मला काहीच महत्व नाही का? सगळे प्रश्न तिच्या डोक्यात फिरू लागले.


पुढील भाग लवकरच.


आवडल्यास share नक्की करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरेंज मॅरेज - अनोळखी पासून जिवलगा पर्यंत ( भाग - 1 )

'खाशाबा' – मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक ऐतिहासिक पर्व; नागराज मंजुळे घेऊन येत आहेत ऑलिम्पिक वीराची प्रेरणादायी कहाणी

महत्त्व