मराठी चित्रपटसृष्टीचे सुवर्ण दिवस! 2026 च्या पहिल्या सहामाहीत बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमाचा दणदणाट
एक काळ असा होता की मराठी चित्रपट फक्त समीक्षकांची पसंती मिळवत होते, पण बॉक्स ऑफिसवर हिंदी किंवा दक्षिण भारतीय चित्रपटांशी स्पर्धा करणे त्यांच्यासाठी कठीण होते. मात्र 2026 या वर्षाने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. अवघ्या सहा महिन्यांत मराठी चित्रपटांनी कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले असून, प्रेक्षकांनी पुन्हा एकदा "मराठी सिनेमा म्हणजे दर्जा, मनोरंजन आणि इतिहास" यावर शिक्कामोर्तब केले आहे. 2026 च्या पहिल्या सहामाहीत मराठी चित्रपटसृष्टीने तब्बल 250 कोटी रुपयांहून अधिकची एकूण कमाई करत नवा इतिहास रचला आहे. अनेक वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीला असे सुवर्ण दिवस पाहायला मिळत आहेत. या यशामागे पाच चित्रपटांचा सिंहाचा वाटा आहे. इतिहास, अध्यात्म, शिक्षण, लोककथा आणि कौटुंबिक मनोरंजन अशा विविध विषयांवरील या चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणले. १. राजा शिवाजी – ₹130 कोटी 2026 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेला "राजा शिवाजी" हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या भव्य ऐ...